Posts

||विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले|| मित्रांनो, गेले काही महिने ऑफिस ला येता, जाता, लांबच्या प्रवासात, फावल्या वेळेत फूंकनळी -अर्थात  Youtube (कोणीही यावे आणि ह्या फुंकनळीतून आपला ठेवा आंतरजालावर फुंकून टाकतो) - जिथून जे काही मिळेल, तेथून काही ना काही ऐकण्याचा आणि आपली जिज्ञासा तृप्त करण्याचा, आपले अनुभव विश्व (!) समृद्ध करू पाहण्याचा चाळा जडला आहे. विषयांचे कसलेही बंधन नाही. एखाद वेळेस विद्यार्थी दशेत रूमवर राहताना, खानावळीत आज कुठली भाजी (अर्थात नावडती) ह्याचा अंदाज बांधता येईल, पण एखाद्या विषयाला, संदर्भाला जोडून Youtube आपल्या नजरे समोर काय सादर करेल ह्याचा काहीही नेम नाही. अर्थात हे चिरंतन सत्य आपणा सर्व नेटकर भाविकांना एव्हाना कळून चुकले असेलच. असो! तर ह्या लालसेपोटी बऱ्याच वेळा काही दिग्गज व्याख्यातांच्या,त्यांच्या स्वतःच्या अभ्यासावर, चिंतनावर, कष्टावर बेतलेले "हिरे-मोती" गवसले- जसे होते तश्या भुरळ पडणाऱ्या निसर्गदत्त अवतारात, तर काही व्याख्यातांनी अत्यंत जुन्या काळापासून उपलब्ध असलेल्या दस्त ऐवजावर, अभ्यास करून, एकत्रित करून मांडलेल्या स्वरूपात मिळाली- जसा  का एखादा...